शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

'आँखो में आँखे डालना' महागात पडणार; माफी न मागितल्यास आझम खान यांच्यावर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 5:43 PM

भाजपाच्या महिला खासदाराबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: लोकसभेतील कामकाजादरम्यान अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपा खासदार रमा देवी यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांना महागात पडणार आहे. या प्रकरणी आज विरोधी पक्षातील मुख्य नेत्यांसोबत आज लोकसभा अध्यक्षांनी चर्चा केली. खान यांनी सभागृहात रमा देवी यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. लोकसभेत काल (शुक्रवार) आझम खान यांनी केलेल्या विधानानं मोठा वाद झाला. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अधीर रंजन चौधरी, जयदेव गल्ला, दानिश अली, सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते. आझम खान यांनी त्यांच्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, त्यांनी माफी मागण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नेमकं काय घडलं होतं?लोकसभेत चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले खान बोलायला उभे राहिले. त्यांनी ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपा खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतरही खान त्यांच्या विधानावर ठाम राहिले. माझं विधान सदनाच्या कामकाजाच्या दृष्टीनं चुकीचं असल्यास मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हणत ते सदनातून निघून गेले होते.

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीlok sabhaलोकसभा