शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

'आझम खान यांचं शीर कापून संसदेच्या दरवाजावर टांगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:41 IST

रमा देवी यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी टीका केली आहे. आ

ठळक मुद्देरमा देवी यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी टीका केली आहे. आझम खान यांचं शीर कापलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य अडवणी यांनी केलं आहे. 'आझम खान यांचं शीर कापून संसदेच्या दरवाजावर टांगा'

नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुरुवारी (25 जुलै) आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपाच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केलं. यामुळे लोकसभेत एकच गोंधळ झाला. त्यांच्या या विधानानंतर वाद झाला आहे. रमा देवी यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी टीका केली आहे. आझम खान यांचं शीर कापलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य अडवणी यांनी केलं आहे. 

'आझम खान यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. आझम खान यांचं शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगण्यात यावं. देशात जेव्हा गंभीर समस्येवर चर्चा होते तेव्हा नेहमी आझम खान आणि ओवैसी वाद निर्माण करतात. त्यामुळे महिलांचा अपमान करणाऱ्यांना असं केल्यास काय परिणाम होतात याची जाणीव होईल' असं भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी म्हटलं आहे. 

तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले आझम खान बोलायला उभे राहिले. त्यांनी ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपाच्या खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतरही खान त्यांच्या विधानावर ठाम राहिले. माझं विधान सदनाच्या कामकाजाच्या दृष्टीनं चुकीचं असल्यास मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हणत ते सदनातून निघून गेले. 

आझम खान यांचं विधान कामकाजातून वगळण्यात यावं असे आदेश यानंतर दिले गेले. विधानसभा, लोकसभा, राज्यसभेच्या कामाकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या खान यांनी त्यांच्या विधानाबद्दल त्वरित माफी मागायला हवी, अशी मागणी कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचं पावित्र्य प्रत्येकानं जपायला हवं, असं आवाहन केलं. 'संसदेच्या कामकाजातून हे विधान काढा, ते वक्तव्य वगळा, असं म्हणणं सोपं आहे. मात्र अशा मागण्या करण्याची गरजच का भासते? एकदा विधान केल्यावर ते लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळे आपण सर्वांनी संसदेचं पावित्र्य जपलं पाहिजे,' असं बिर्ला म्हणाले.

 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाtriple talaqतिहेरी तलाकWomenमहिला