शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आझम खान यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 11:49 IST

महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आझम खान यांनी याप्रकरणी सोमवारी (29 जुलै) लोकसभेत दोन वेळा माफी मागितली आहे. 

ठळक मुद्देमहिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आझम खान यांनी याप्रकरणी लोकसभेत दोन वेळा माफी मागितली आहे. आझम खान यांची वर्तवणूक चुकीचीच असल्याचं रमा देवी यांनी म्हटलं आहे. 'आझम खान यांनी माझाच नाही तर देशातील स्त्री-पुरुषांचा अपमान केला आहे' असं रमा देवी यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना गुरुवारी (25 जुलै)  समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपाच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केलं. यामुळे लोकसभेत एकच गोंधळ झाला. त्यांच्या या विधानानंतर वाद झाला आहे. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आझम खान यांनी सोमवारी (29 जुलै) याप्रकरणी लोकसभेत दोन वेळा माफी मागितली आहे. 

'अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा यामागे माझा अजिबात हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असं त्यांना वाटत असेल तर मी त्याबाबत क्षमा मागतो आहे' असं आझम खान यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी आझम खान यांनी सोमवारी लोकसभेत दोन वेळा माफी मागितली आहे. आझम खान यांची वर्तवणूक चुकीचीच असल्याचं रमा देवी यांनी म्हटलं आहे. 'आझम खान यांनी माझाच नाही तर देशातील स्त्री-पुरुषांचा अपमान केला आहे' असं रमा देवी यांनी म्हटलं आहे.  

तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले आझम खान बोलायला उभे राहिले. त्यांनी ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपाच्या खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतरही खान त्यांच्या विधानावर ठाम राहिले. माझं विधान सदनाच्या कामकाजाच्या दृष्टीनं चुकीचं असल्यास मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हणत ते सदनातून निघून गेले. 

आझम खान यांचं विधान कामकाजातून वगळण्यात यावं असे आदेश यानंतर दिले गेले. विधानसभा, लोकसभा, राज्यसभेच्या कामाकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या खान यांनी त्यांच्या विधानाबद्दल त्वरित माफी मागायला हवी, अशी मागणी कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचं पावित्र्य प्रत्येकानं जपायला हवं, असं आवाहन केलं. 'संसदेच्या कामकाजातून हे विधान काढा, ते वक्तव्य वगळा, असं म्हणणं सोपं आहे. मात्र अशा मागण्या करण्याची गरजच का भासते? एकदा विधान केल्यावर ते लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळे आपण सर्वांनी संसदेचं पावित्र्य जपलं पाहिजे,' असं बिर्ला म्हणाले.

'आझम खान यांचं शीर कापून संसदेच्या दरवाजावर टांगा'

रमा देवी यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी टीका केली होती. आझम खान यांचं शीर कापलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य अडवणी यांनी केलं होतं 'आझम खान यांचं वक्तव्य निषेधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. आझम खान यांचं शीर कापून संसेदच्या दरवाजाला टांगण्यात यावं. देशात जेव्हा गंभीर समस्येवर चर्चा होते तेव्हा नेहमी आझम खान आणि ओवैसी वाद निर्माण करतात. त्यामुळे महिलांचा अपमान करणाऱ्यांना असं केल्यास काय परिणाम होतात याची जाणीव होईल' असं भाजपा नेते आफताब अडवाणी यांनी म्हटलं होतं. 

आझम खान यांच्या अडचणीत वाढ, आणखी 13 प्रकरणांत चार्जशीट दाखलसमाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात 13 प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल केली आहे. तसेच माजी खासदार जया प्रदाही कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधातही सहा चार्जशीट दाखल झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांनी शाहबादमध्ये एका जनसभेला संबोधित करतानाही जया प्रदा यांच्याबद्दल अश्लील टिपण्णी केली होती. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीlok sabhaलोकसभाBJPभाजपाWomenमहिला