आझम खान यांनी चालवली विना परवाना बस

By Admin | Updated: March 5, 2015 19:31 IST2015-03-05T18:25:59+5:302015-03-05T19:31:12+5:30

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी गुरुवारी एक खाजगी बस विनापरवाना रस्त्यावरून किमान १० मिटर चालवली.

Azaam Khan runs a non-licensed bus | आझम खान यांनी चालवली विना परवाना बस

आझम खान यांनी चालवली विना परवाना बस

>ऑनलाइन लोकमत
इलाहबाद, दि. ५ - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी गुरुवारी एक खाजगी बस विनापरवाना रस्त्यावरून किमान १० मिटर चालवली. 
यावेळी वाहतूक पोलीस व जिल्हाधिकारी उपस्थित होते. याघटनेनंतर आझम खान यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपण सरकारी गाडी पेक्षा कमी वेगाने चालवल्याचे म्हटले आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपानेते विजय बहादूर पाठक यांनी असे सांगितले की, खान यांच्यागाडीमध्ये महिला व लहान मुलं बसलेली होती. त्यांनी गाडी जवळ जवळ दुभाजकावर घातली असती असेही पाठक यांनी सांगितले. यापूर्वी आझम खान यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना त्यांची हरवलेली म्हैस शोधायच्या कामाला लावले होते. 

Web Title: Azaam Khan runs a non-licensed bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.