शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

आता दिल्लीत १० लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत; जाणून घ्या आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:26 IST

Ayushman Bharat Yojana : शपथविधी सोहळ्यानंतर दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने दिल्लीत आयुष्मान योजना लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

Delhi Ayushman Card : नवी दिल्ली : दिल्लीत नुकतेच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने सरकार स्थापन झाल्यानंतर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या आयुष्मान भारत योजनेला मंजुरी दिली आहे. आता दिल्लीतही जन आरोग्य योजना लागू केली जाणार आहे. याअंतर्गत, १ लाख लोकांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड बनवले जातील. 

आयुष्मान भारत योजना अद्याप दिल्लीत लागू झालेली नव्हती. मागील केजरीवाल सरकारने ही योजना लागू केली नव्हती. दरम्यान, आता केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेसंबंधी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दिल्लीत सुरू केले आहे. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्लीतील लोकांसाठी आयुष्मान भारत कार्ड कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, कालच शपथविधी सोहळ्यानंतर दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने दिल्लीत आयुष्मान योजना लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

दिल्लीकरांना होणार डबल लाभआयुष्मान कार्ड बनवल्यानंतर, कार्डधारकाला दरवर्षी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार दिले जातात. कार्डधारक नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये या उपचारांचा लाभ घेऊ शकतात, ज्याचा संपूर्ण खर्च सरकार करते. यामध्ये दिल्ली सरकारकडून ५ लाख रुपयांचे आणि केंद्र सरकारकडून ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा देण्यात येईल. म्हणजेच, देशातील उर्वरित भागात, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू झाल्यानंतर दिल्लीकरांना ५ लाख रुपयांच्या डबल लाभ मिळणार म्हणजेच १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील.

आयुष्मान कसे कार्ड बनवायचे?जर तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर आधी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासावे लागेल. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला येथे 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक भरावा लागेल ज्यावर OTP येईल. आता हा OTP आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरून लॉगिन करा. यानंतर योजना निवडून आपलं राज्य आणि तुमचा जिल्हा निवडा. यानंतर, 'Search By' वर जा आणि आधार सारखे कोणतेही एक दस्तऐवज निवडा आणि नंतर तुमचा आधार क्रमांक भरा आणि कॅप्चा देखील प्रविष्ट करा. 

आता सर्च वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही हे समजेल. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही आयुष्मान कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊ शकता.संबंधित अधिकारी तुमची पात्रता तपासून काही कागपत्रांची मागणी करेल. त्यानंतर ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होते. अर्ज केल्यानंतर, तुमचे आयुष्मान कार्ड काही वेळात तयार होईल जे तुम्हाला डाउनलोड करावे लागेल.यानंतर, या कार्डद्वारे तुम्ही योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयात दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकता.

कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?- आधार कार्ड- रेशन कार्ड किंवा कुटुंब ओळखपत्र (पीपीपी आयडी)- मोबाईल नंबर- पात्रता यादीतील नाव- जात प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गातून असल्यास)- उत्पन्नाचा दाखला- कुटुंबाच्या सध्याच्या स्थितीशी संबंधित कागदपत्रे

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतdelhiदिल्लीHealthआरोग्य