महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:20 IST2025-09-15T05:19:30+5:302025-09-15T05:20:15+5:30

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे.

Ayushman beneficiaries triple in Maharashtra in one year; State faces challenge to expand to rural areas | महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत एक वर्षात तब्बल तिपटीने वाढ झाली आहे.  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरली आहे.

पीएमजेएवाय अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी उपचारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. आता महाराष्ट्रासमोरचे मोठे आव्हान म्हणजे ही गती कायम ठेवणे, ग्रामीण भागापर्यंत पोहोच वाढवणे आणि इतर राज्यांशी बरोबरी साधणे.

आयुष्मानचे लाभार्थी

राज्य                 २०२४-२५

कर्नाटक               ३८ लाख

राजस्थान                     १९.२ लाख

छत्तीसगड                     १७.४ लाख

महाराष्ट्र               १३ लाख+

बिहार                 ९.५ लाख

आयुष्मान भारत : महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 

३.९ लाख

१३ लाख +

२०२४-२५

महाराष्ट्रासमोर आव्हाने काय?

पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राची पीएमजेएवाय अंतर्गत कामगिरी सामान्य राहिली. २०२० ते २०२३ दरम्यान राज्यात सरासरी रुग्णांचे प्रमाण हे केवळ २.५ ते ३.९ लाख वार्षिक होते. यंदा त्यात जोरदार वाढ झाली. मात्र एकूण लाभार्थ्यांच्या संख्येत इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही महाराष्ट्र मागेल आहे.

या अंतरामागे रचनात्मक व धोरणात्मक कारणे आहेत. महाराष्ट्राने दीर्घकाळ स्वतःची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवली. २०२०मध्ये ती पीएमजेएवायमध्ये समाविष्ट झाली असली तरी संपूर्ण राज्यासाठी विस्तृत कव्हरेज जुलै २०२४पासूनच सुरू झाले.

Web Title: Ayushman beneficiaries triple in Maharashtra in one year; State faces challenge to expand to rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.