शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत आणखी एका प्राणप्रतिष्ठेची तयारी, रामललानंतर आता 'राजा रामा'चा राज्याभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:03 IST

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात भगवान रामाचा दरबार तयार झाला आहे.

Ayodhya Ram Mandir : गेल्यावर्षी अयोध्येत भगवान राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिरात विराजमान असलेल्या बालरुपातील 'रामलला'ची प्राणप्रतिष्ठा झाली. आता जवळजवळ सव्वा वर्षानंतर भव्य राम मंदिरात आणखी एका अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिरातच भगवान श्रीरामाचा भव्य दरबारही बांधण्यात आला आहे. हा दरबार मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधला असून, लवकरच याचे लोकार्पण होईल. 

द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, हा अभिषेक सोहळा भव्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अलिकडेच श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत समारंभाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना अभिषेक समारंभाची तारीख जाहीर करण्याची जबाबदारी देण्यात आली. हा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यासारखा नसून, त्याचे स्वरुप बरेच विस्तृत असेल, असे सांगितले जात आहे. 

गेल्यावर्षी रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला, आता राजा रामाचा अभिषेक सोहळा होईल. हा समारंभ मंदिर बांधकामाच्या पूर्णतेचा एक भाग असेल. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष सध्या पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आहेत. मिश्रांनी अलीकडेच सांगितले होते की, मंदिर संकुलाचे बांधकाम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल, तर परकोटाच्या कंपाऊंड भिंतीचे उर्वरित काम या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल.

राम दरबार कसा असेल?कर्नाटकातील कलाकार अरुण योगीराज यांनी रामललाची 51 इंच उंच मूर्ती तयार केली होती, तर जयपूरमध्ये शिल्पकार प्रशांत पांडे यांच्या नेतृत्वाखाली 20 कारागिरांच्या पथकाद्वारे पांढऱ्या मकराना संगमरवरापासून राम दरबार बनवला जात आहे. रामायणाची सर्वात लोकप्रिय आवृत्ती असलेल्या रामचरितमानसचे लेखक संत तुलसीदास यांची एक मोठी मूर्तीदेखील या संकुलात स्थापित केली जात आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याTempleमंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश