शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 17:59 IST

अयोध्येतील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अयोध्येतील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांना निमंत्रित केलं असतं तर दीपोत्सवातही सहभागी झाले असते, असे ते म्हणाले. भाजपा सणांचंही राजकारण करत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.

अयोध्येत दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी दीपोत्सवाने दोन रेकॉर्ड केले. पहिला रेकॉर्ड सरयू आरतीचा तर दुसरा रेकॉर्ड सर्वाधिक दिवे लावण्याचा झाला. या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु समाजवादी पक्षाचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. 

भाजपाने या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं नव्हतं आणि आता भाजपा सणांचं राजकारण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अवधेश प्रसाद म्हणतात की, हा कार्यक्रम भाजपासाठी वैयक्तिक झाला आहे. मी येथून खासदार असून मला निमंत्रित करण्यात आलं नाही.

अवधेश प्रसाद यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अयोध्येतील भाजपाचे आमदार वेदप्रकाश गुप्ता यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं की, अवधेश प्रसाद यांना प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र आजपर्यंत त्यांना अयोध्येला भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. देश-विदेशात दीपोत्सवाचा जो अद्भूत कार्यक्रम झाला त्यावर खासदार आता राजकारण करत आहेत. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSamajwadi Partyसमाजवादी पार्टीDiwaliदिवाळी 2024BJPभाजपा