शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
6
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
7
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
8
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
9
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
10
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
11
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
12
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
13
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
14
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
15
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
16
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
17
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
18
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
19
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
20
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Pathaan: "शाहरुखचा 'पठाण' ज्या थिएटरमध्ये लागेल ते थिएटर जाळून टाका", अयोध्येच्या महंतांचं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:07 IST

Pathaan Movie: अयोध्येतील महंत राजू दास यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर बहिष्काराची मागणी केली आहे.

अयोध्या-

अयोध्येतील महंत राजू दास यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठाण'वर बहिष्काराची मागणी केली आहे. इतकंच नाही, तर पठाण चित्रपट ज्या ज्या सिनेमागृहांमध्ये लावला जाईल ते जाळून टाकण्याचंही आवाहन महंत राजू दास यांनी केलं आहे. शाहरुख खाननं सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप राजू दास यांनी केला आहे. 

'पठाण'मध्ये पाहायला मिळणार दीपिकाचा आजवरचा सर्वात बोल्ड लूक, चाहते घायाळ!

अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले, "बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये सातत्यानं सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल याचाच प्रयत्न केला जात आहे. हिंदू देवीदेवतांचा कसा अपमान करता येईल याची संधी शोधली जाते. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं बिकनी परिधान करुन साधूसंतांची आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे"

'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता

राजू दास यांनी शाहरुखवर सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचाही आरोप केला. सिनेमात भगव्या रंगाच्याच बिकिनीचा वापर करण्याचं काय कारण होतं. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवण्यासाठी हे मुद्दाम केलं गेलं. लोकांनीच यावर कठोर कारवाई केली पाहिजे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकावा. तसंच हा सिनेमा ज्या थिएटरमध्ये लागेल ते जाळून टाका. अशा लोकांसोबत अशाच प्रकारे वागायला हवं, असं राजू दास म्हणाले. 

२५ जानेवारीला रिलीज होणार 'पठाण'शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' सिनेमा नववर्षात २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झालं. यात दीपिकाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. पण दीपिकानं या गाण्यात भगव्या रंगातील बिकीनीत दिसली आहे. यावरुनच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंदू संघटनांनी दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीला विरोध केला आहे. हिंदू महासभाचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनीही 'पठाण' चित्रपटावर बहिष्काराची मागणी केलीय.

टॅग्स :Pathan Movieपठाण सिनेमाDeepika Padukoneदीपिका पादुकोणShahrukh Khanशाहरुख खान