Ayodhya: अयोध्येत वेगळाच ड्रामा रंगला! शाळीग्रामवर छन्नी, हातोडा चालला तर अन्न-पाणी त्यागणार; सर्वात जुन्या आचार्यांची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 18:30 IST2023-02-03T18:30:19+5:302023-02-03T18:30:52+5:30
शाळीग्राम दगडावरूनही वाद सुरू झाला आहे. रामसेवक पुरमच्या कार्यशाळेत महाकाय दगडाची पूजा सुरू असताना अचानक तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य तिथे पोहोचले.

Ayodhya: अयोध्येत वेगळाच ड्रामा रंगला! शाळीग्रामवर छन्नी, हातोडा चालला तर अन्न-पाणी त्यागणार; सर्वात जुन्या आचार्यांची धमकी
भगवान राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या बनविण्यासाठी नेपाळहून मागविलेले शाळीग्राम दगड अयोध्येत पोहोचले आहेत. परंतू, आता यावरून आयोध्येत वेगळाच ड्रामा सुरु झाला आहे. अयोध्येतील रामसेवक पुरममध्ये हे दोन्ही महाकाय दगड ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी अहिल्यारुपी दगडाला भगवान श्रीरामाचे रूप मानून पूजा केली जात होती, तेवढ्यात या दगडांवर छन्नी-हातोडा पडू देणार नाही असे सांगत अयोध्येतील सर्वात जुने पीठ असलेल्या तपस्वीजींच्या छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी वाद निर्माण केला आहे.
शाळीग्राम दगडावरूनही वाद सुरू झाला आहे. रामसेवक पुरमच्या कार्यशाळेत महाकाय दगडाची पूजा सुरू असताना अचानक तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य तिथे पोहोचले. त्यांनी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना एक पत्र दिले. 'भगवान रामलल्लाची मूर्ती बनवण्याच्या उद्देशाने महाकाय शालिग्राम खडक आणण्यात आले आहेत. जी भगवान राम आणि लक्ष्मणाची रूपे आहेत. या खडकावर हातोडा पडला तर मी अन्नपाणी सोडून देईन, अशी धमकीच आचार्यांनी दिली आहे.
श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना मी एक पत्र दिले आहे. शाळीग्राम हे स्वतः परमपूज्य देव आहेत. यामुळे शाळीग्रामवर जर छन्नी-हातोडा पडला तर सर्वनाश होईल. 2 महाकाय दगड आणि दोन लहान शाळीग्राम दगड दिले आहेत. ही चारही ईश्वराची बालरूपे आहेत. त्यावर हातोडा चालविला तर मी अन्न पाणी त्याग करणार आहे. प्रसंगी प्राण त्याग करेन पण या लोकांना असे करू देणार नाही असे आचार्य यांनी म्हटले आहे.