अजब ! जयललितांच्या फोटोसमोर सुरू आहेत सरकारी बैठका
By Admin | Updated: October 15, 2016 13:00 IST2016-10-15T12:43:23+5:302016-10-15T13:00:44+5:30
सचिवालयात सुरू असलेल्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री जयललिता यांची कमतरता भासू नये यासाठी त्यांचा फोटो समोर ठेवून बैठका घेतल्या जात आहेत

अजब ! जयललितांच्या फोटोसमोर सुरू आहेत सरकारी बैठका
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 15 - प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अनुपस्थितीत राज्य सरकारचं काम अनोख्या पद्धतीने सुरु आहे. सचिवालयात सुरू असलेल्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री जयललिता यांची कमतरता भासू नये यासाठी त्यांचा फोटो समोर ठेवून बैठका घेतल्या जात आहेत. बैठकीच्या वेळी समोर फोटो असावा याची खास काळजी मंत्री घेत आहेत. जयललिता यांच्या अनुपस्थितीतही राज्याचा कारभार त्यांच्या डोळ्यांसमोर चालू राहावा यासाठी ही सगळी कसरत केली जात आहे.
राज्य सरकारच्या माहिती विभागाकडून बैठकांसाठी फोटो जारी केला जात आहे. इतकंच नाही तर फोटोखाली 'सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत आहे' असं लिहिलं जात आहे. मात्र आजारी जयललिता यांनी हे आदेश कसे दिले याबाबत अधिका-यांनी खुलासा केलेला नाही.
जयललिता यांच्या दीर्घकाळच्या इस्पितळातील वास्तव्यामुळे तमिळनाडू राज्याच्या प्रशासनात निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्याचा तात्पुरता उपाय म्हणून जयललिता यांच्या सल्ल्यावरून त्यांच्याकडील सर्व खाती ओ. पनिरसेल्वम यांच्याकडे सोपविली आहेत. मुख्यमंत्रीपदी जयललिताच कायम असल्या तरी मंत्रिमंडळ बैठक मात्र पनिरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे राजभवनाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले होते.
जयललिता (६८) यांना ताप आणि निर्जलीकरणामुळे २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,