थरथराट बंधनमुक्त!
By Admin | Updated: August 15, 2014 03:12 IST2014-08-15T03:12:01+5:302014-08-15T03:12:01+5:30
गोविंदांची वयोमर्यादा आणि हंडी फोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या मानवी मनोऱ्याच्या थराची उंची याबाबतीत घातलेल्या बंधनांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिल्याने गोविंदा मंडळांमध्ये उत्साह.

थरथराट बंधनमुक्त!
नवी दिल्ली : कृष्णजन्माच्या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवावर उच्च न्यायालयाने गोविंदांची वयोमर्यादा आणि हंडी फोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या मानवी मनोऱ्याच्या थराची उंची याबाबतीत घातलेल्या बंधनांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिल्याने गोविंदा मंडळांमध्ये नव्याने उत्साह संचारला आहे.
उच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशानुसार १८ वर्षांखालील कोणाही व्यक्तीस दहीहंडी फोडण्यात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने बालगोविंदांची ही वयोमर्यादा १२ वर्षे केली आहे. परिणामी १२ वर्षांहून अधिक वयाची कोणीही व्यक्ती गोविंदा पथकात सहभागी होऊ शकेल. तसेच थरांच्या कमाल उंचीवर उच्च न्यायालयाने घातलेले २० फुटांचे बंधनही तहकूब ठेवले गेल्याने नऊ किंवा त्याहूनही जास्त थर लावून नवा विक्रम प्रस्थापित करू पाहणाऱ्या गोविंदा मंडळांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. उत्सवावरील शिथिल केलेले हे निर्बंध सध्यातरी या वर्षापुरतेच लागू असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)