'म्यानमारचा प्रवास टाळा', परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:24 PM2023-11-21T21:24:43+5:302023-11-21T21:38:48+5:30

मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स आणि म्यानमारमधील सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे, भारत सरकारने भारतीय लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली.

'Avoid travel to Myanmar' Ministry of External Affairs issued a guideline for Indians | 'म्यानमारचा प्रवास टाळा', परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली

'म्यानमारचा प्रवास टाळा', परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली

म्यानमार मधील मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स आणि म्यानमारमधील सैनिकांमधील चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने भारतीय लोकांसाठी एक मार्गदर्शन सूचना जारी केली आहे. यात परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सांगितले की, लोकांनी म्यानमारला जाणे टाळावे.

परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, "म्यानमारमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना म्यानमारमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे." याशिवाय जे लोक आधीच म्यानमारमध्ये राहत आहेत त्यांनी हिंसाचार प्रभावित भागात जाऊ नये. रस्त्याने आंतरराज्य प्रवास देखील टाळावा.

राहुल आणि सोनिया गांधींना ED कडून मोठा धक्का, यंग इंडिया आणि AJL ची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त

मंत्रालयाचे प्रवक्ते अरंदीम बागची यांनीही सूचना ट्विट केली आहे. यात पुढे म्हटले आहे की, म्यानमारमध्ये राहणाऱ्या लोकांना भारतीय दूतावासात फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी पीडीएफने म्यानमारच्या चिन राज्यावर हल्ला केला होता. प्रत्युत्तर म्हणून म्यानमारच्या लष्कराने प्रत्युत्तर दिले. 

मिझोराममध्ये पळून गेलेल्या म्यानमारच्या २९ सैनिकांना रविवारी १९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले. पीडीएफच्या लष्करी दलांनी छावण्या ताब्यात घेतल्यानंतर भारतात आलेल्या म्यानमार लष्कराच्या ७० जवानांना आतापर्यंत त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि १५ नोव्हेंबरपासून कोणत्याही चकमकीचे वृत्त नाही.

Web Title: 'Avoid travel to Myanmar' Ministry of External Affairs issued a guideline for Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.