मित्राकडून होणारा लैंगिक छळ टाळण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी

By Admin | Updated: March 7, 2016 22:56 IST2016-03-07T22:56:23+5:302016-03-07T22:56:23+5:30

मित्राकडून लैंगिक छळ होण्याची शक्यता लक्षात आल्यामुळे एका तरुणीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याची घटना पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील लिलुहा येथे घडली.

To avoid sexual harassment from a friend, jump from the second floor | मित्राकडून होणारा लैंगिक छळ टाळण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी

मित्राकडून होणारा लैंगिक छळ टाळण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी

हावडा : मित्राकडून लैंगिक छळ होण्याची शक्यता लक्षात आल्यामुळे एका तरुणीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याची घटना पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील लिलुहा येथे घडली.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लिलुहाच्या पायराबागान परिसरात रविवारी हा प्रकार घडला. पीडित तरुणी तिच्या दोन मित्रांसोबत हुबळी येथे गेली होती. तिच्या मित्रांनी दारूच्या नशेत तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. लैंगिक शोषणाचा धोका लक्षात घेता, तरुणीने थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यात तिच्या डोक्याला किरकोळ इजा झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: To avoid sexual harassment from a friend, jump from the second floor