शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये भीषण हिमस्खलनाच्या घटना; काही जवान बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 09:09 IST

अ‍ॅव्हलॉन्च रेस्क्यू टीमकडून मदतकार्य सुरू

श्रीनगर: उत्तर काश्मीरमधील अनेक भागांमध्ये मंगळवारी संध्याकाळी उशिरा हिमस्खलनाच्या घटना घडल्या. यामुळे लष्कराचे काही जवान बेपत्ता झाले आहेत. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदिपोरा जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सध्या अ‍ॅव्हलॉन्च रेस्क्यू टीमकडून मदतकार्य सुरू आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप सुरक्षा दलांकडून देण्यात आलेली नाही. बांदिपोरातील गुरेज सेक्टर आणि कुपवाड्यातील कर्नाह सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडल्या. हे दोन्ही भाग उत्तर काश्मीरमध्ये येतात. १८ हजार फूट उंचीवर झालेल्या हिमस्खलनात चार जवान बेपत्ता झाले आहेत. जवानांच्या शोधासाठी अ‍ॅव्हलॉन्च रेस्क्यू टीमनं प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय सुरक्षा दलांच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीनंदेखील मदतकार्य सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत सियाचिनमध्ये हिमस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये कित्येक जवानांना प्राण गमवावे लागले. जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये तीन दिवसांपूर्वीदेखील हिमस्खलन झालं होतं. त्यामध्ये लष्कराच्या दोन जवान शहीद झाले. याआधी १८ नोव्हेंबरलादेखील सियाचिनमध्ये हिमस्खलन झालं होतं. त्यात लष्कराच्या ४ जवानांनी हौतात्म्य पत्करलं. सियाचिनमध्ये घडलेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत शेकडो जवानांना वीरमरण आलं आहे. १९८४ पासून सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या घटनांमध्ये सुरक्षा दलाच्या ३५ अधिकाऱ्यांसह १००० पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. २०१६ मध्ये सियाचिनमध्ये हिमस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. यामध्ये १० जवान शहीद झाले होते.  

टॅग्स :Avalancheहिमस्खलनJammu Kashmirजम्मू-काश्मीर