सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 22:11 IST2019-11-18T22:02:18+5:302019-11-18T22:11:11+5:30
18000 फूट उंचीवर अडकलेल्या या जवानांचा अद्याप शोध लागला नाही.

सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले
श्रीनगर : जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली आठ जवान अडकले आहेत. सोमवारी दुपारी जवानांची एक तुकडी पेट्रोलिंग करत असताना हिमस्खलन झाले. दरम्यान, जवानांना वाचविण्यासाठी लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास हिमस्खलनामध्ये पेट्रोलिंग करणारे आठ जवान अडकले. याबाबची माहिती मिळताच लष्कराचे एक पथक जवानांच्या शोधासाठी घटनास्थळी झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र, 18000 फूट उंचीवर अडकलेल्या या जवानांचा अद्याप शोध लागला नाही.
Army Sources: The avalanche had hit the Army positions in the northern glacier at around 3.30 pm today. #Siachenhttps://t.co/W1K4mQkPw7
— ANI (@ANI) November 18, 2019
हिवाळ्यामध्ये उणे 60 अंशापर्यंत तापमान
जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असणाऱ्या या भागात हिवाळ्यात उणे साठ अंशापर्यंत तापमान असते. याठिकाणी हिमस्खलनाच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.तसेच, याआधीही या भागात हिमस्खलन होऊन अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.