ऑटोचालकाची फौजदाराला मारहाण

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:34+5:302015-07-12T23:56:34+5:30

नागपूर : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेच्या फौजदाराला (एएसआय) ऑटोचालकाने मारहाण केली. जगन्नाथ चंपतराव चौके असे फिर्यादी एएसआयचे नाव आहे.

The auto rickshaw assaulted the soldier | ऑटोचालकाची फौजदाराला मारहाण

ऑटोचालकाची फौजदाराला मारहाण

गपूर : कारवाईसाठी पुढे सरसावलेल्या वाहतूक शाखेच्या फौजदाराला (एएसआय) ऑटोचालकाने मारहाण केली. जगन्नाथ चंपतराव चौके असे फिर्यादी एएसआयचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी ५.३० ला मेयो चौकात त्यांनी ऑटो (एमएच ४९/ ई - ११२७) च्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. तो सुसाट पळून जात असल्यामुळे त्याचा पाठलाग करून चौके यांनी काही अंतरावर त्याला पकडले. ते कारवाई करीत असताना ऑटोचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी चौकेंना मारहाण केली आणि पळून गेले. चौके यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
---

Web Title: The auto rickshaw assaulted the soldier