शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टला द्वितीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 2:10 AM

जगभरातून ४० देशांचे संघ सहभागी; अंतिम फेरीत दोन संघांची धडक

नवी दिल्ली : पाचव्या जागतिक रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादच्या रोबोनिस्टने दुसरा क्रमांक पटकावला आहे. दिल्लीत सलग तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत दहा संघ होते. रोबोनिस्टच्या दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम विजेत्यांच्या यादीत रोबोनिस्टच्या सिनिअर संघाला दुसरे तर ज्युनिअर संघाला पाचवे स्थान मिळाले.आॅल इंडिया कॅन्सिल फॉर रोबोटीक्स आॅटोमेशनच्या वतीने पाचव्या जागतिक रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धा-टेक्नोशियान-२०१९ चे आयोजन करण्यात आले होते. त्यागराज स्पोर्टस कॅम्पलेक्समध्ये झालेल्या स्पर्धेत ४० देशांमधील संघ सहभागी झाले होते.विजेत्या संघात आर्यवीर दर्डा, प्रिथ्वीर गाडेकर, रेयांश माछार, रिध्दिमा तुलशन, शुभम कागलीवाल, असीम राक्षसभुवनकर, नील मापारी, ओंकार बोरडे, मैत्रेय दुसाने, श्रीवर्धन टाकळकर, प्रणव वेदपाठक, सिद्धांश शर्मा, समर्थ जोशी, योगेश मोरे, कौस्तुभ कुलकर्णी, आंचल सक्सेना व पी. ए. प्रत्यूक्ष यांचा समावेश होता. रोबोनिस्टचे प्रशिक्षक दीपक कोलते, चेतन पवार, सनी सुरवाडे, निमिष पाटणी, अभिजीत बेडके, मोझेस खरात व अश्विन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्पर्धेची अंतिम फेरी उत्कंठा वाढवणारी होती. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या संघांशी रोबोनिस्टचा सामना होता. आपल्या रोबोटला अडथळ्याची शर्यत (रोबो रेस) पार करता यावी यासाठी प्रत्येक संघ घडपडत होता. त्यासाठी त्यांना दोनदा संधी मिळणार होती.सर्वात मोठे आव्हान ट्रॅकवर असलेले शेवटचे दोन अडथळे पार करणे हेच होते, अशी माहिती दीपक कोलते यांनी दिली. शेवटचे दोन्ही अडथळे पार केल्याशिवाय पूर्ण गुण मिळणे शक्यच नव्हते. त्यासाठी रोबोनिस्टच्या सिनिअर व ज्युनिअर संघातील सदस्यांनी परस्परांशी चर्चा केली. या सामन्यात रोबेट संचालन (ओपरेटर) करणाऱ्याा प्रणवने योग्य जबाबदारी निभावली. मात्र दुदैर्वाने पहिल्या फेरीत अडथळा पार करण्यात अपयश आले. ज्युनिअर टीमनेही स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली. संयम व विश्वासाने संचालन करणाºया प्रिथ्वीरच्या प्रयत्नांमुळे रोबोटने अडथळे पार केले. अशा प्रकारे कमी वेळात विक्रमी कामगिरी करीत इतर संघांना मागे टाकण्यात ज्युनिअर टीमला यश मिळाले. नियमांचे काटेकोर पालन करुन ऐनवेळी रोबोटमध्ये काही बदलही करण्यात आले होते. त्यामुळेच दुसरी फेरीतील अडथळे रोबोनिस्ट संघाच्या रोबोटने सहजपणे पार केले.रोबोटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून मुलांना खूप शिकायला मिळते. दरवर्षी नव्या गोष्टी कळतात. मुलांमध्ये वर्षभर अशा स्पर्धेसाठी तयारी करण्याची जिद्द निर्माण होते. स्पर्धा संपल्यावर आम्ही प्रत्येक सहभागी संघाशी संवाद साधला. त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान, रोबोट तयार करण्यासाठीचे साहित्य यांची माहिती घेतली. विद्यार्थीच नव्हे तर प्रशिक्षकांसाठीदेखील ही शिकण्याची मोठी संधी असते. - दीपक कोलते, रोबोनिस्टचे प्रशिक्षक