औरंगाबादेत शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध
By Admin | Updated: April 11, 2015 01:40 IST2015-04-11T01:40:56+5:302015-04-11T01:40:56+5:30
औरंगाबादेत शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध

औरंगाबादेत शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध
औ ंगाबादेत शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोधऔरंगाबाद : महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच शिवसेनेने डबलबार उडवून दिला असून, सेनेचे उमेदवार विकास जैन आणि सुमित्रा हाळनोर हे बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र तांत्रिक कारणामुळे जैन यांना अद्याप बिनविरोध म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. वेदांतनगरमधून माजी महापौर विकास जैन यांच्या विरोधात शुक्रवारी चौघांनी अर्ज माघारी घेतल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते गिरजाराम हाळनोर यांनी यंदा ज्योतीनगर वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी सुमित्रा यांना उमेदवारी मिळवून दिली होती. त्यांच्याविरोधात पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या असलेल्या सुनिला क्षत्रीय यांचा छाननीनंतर एकमेव अर्ज शिल्लक होता. आज क्षत्रिय यांनीही अर्ज मागे घेतल्याने हाळनोर यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. महापालिका निवडणुकीत शिवसेना ११३ पैकी ६४ जागा लढवित असून त्यापैकी दोन वॉर्डात त्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (प्रतिनिधी)