बांदेकर व सेझा लिजमधील मालाचा लिलाव

By Admin | Updated: May 9, 2014 02:06 IST2014-05-09T00:51:23+5:302014-05-09T02:06:06+5:30

(पान दोन किंवा एक)

Auction of goods in Bandekar and Szeja Liz | बांदेकर व सेझा लिजमधील मालाचा लिलाव

बांदेकर व सेझा लिजमधील मालाचा लिलाव

(पान दोन किंवा एक)
बांदेकर व सेझाच्या लिजमधील
सर्वाधिक मालाचा लिलाव
पणजी : येत्या सोमवारी होणार्‍या तिसर्‍या टप्प्यातील ई-लिलावामध्ये बांदेकर आणि सेझा स्टरलाईट कंपनीच्या लिजमधील सर्वाधिक मालाचा समावेश आहे. त्यानंतर चौगुले व साळगावकर कंपनीच्या लिजमधील मालाचा क्रमांक लागतो.
ई-लिलावासाठी तयार असलेल्या खनिज मालाची सविस्तर माहिती खाण खात्याने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. कुठच्या कंपनीच्या लिजमध्ये किती प्रमाणात खनिज माल लिलावासाठी उपलब्ध आहे हे आकडेवारीसह स्पष्ट करण्यात आले आहे. सेझा स्टरलाईट कंपनीच्या एकोणीस लिज क्षेत्रांमधील माल लिलावासाठी तयार ठेवण्यात आला आहे. आमोणा जेटी व एमपीटी इथे हा माल ठेवण्यात आला आहे. बांदेकर ब्रदर्स कंपनीच्या अकरा लिजमधील मालाचा सोमवारी लिलाव होणार आहे. हा बहुतांश माल कोठंबी जेटी व तेथीलच भूखंडावर आहे. व्ही. एम. साळगावकर ब्रदर्सच्या पाच लिज क्षेत्रांमधील तर चौगुले कंपनीच्या दहा लिज क्षेत्रांमधील मालाचा सोमवारी लिलाव होणार आहे. सुनंदा बांदोडकर कंपनीने कोठंबी येथील भूखंडांमध्ये ठेवलेल्या खनिज मालाचाही सोमवारी लिलाव होणार असल्याचे खाण खात्याने जाहीर केले आहे. तिशे, सारमानस, मायणा अशा अनेक ठिकाणच्या जेटींवर विविध कंपन्यांचा खनिज माल आहे.
सर्व कामगारांना वेतन (चौकट)
दरम्यान, खाणबंदीच्या काळात किती कामगारांना वेतन दिले गेले नाही याची सविस्तर माहिती दिली जावी, अशी सूचना खाण खात्याने राज्यातील सर्व कंपन्यांना केली होती. त्यानुसार खाण कंपन्यांनी खात्याला आता माहिती सादर केली आहे. खाणबंदीच्या काळातही कुठच्याच कामगाराला विनावेतन ठेवण्यात आले नाही, असा दावा जवळजवळ सर्वच खाण कंपन्यांनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. खाण खात्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील सूचनेनुसार विनावेतन कामगारांबाबतची माहिती मागितली होती व ती सादर करण्यास गुरुवारपर्यंत मुदत होती.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Auction of goods in Bandekar and Szeja Liz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.