शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या परिणामांवर लक्ष, नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:49 IST

कोविशिल्ड लसीचे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन केले जाते, तर कोव्हॅक्सिन लस हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे.

नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड कंपनीने विकसित केलेली कोविशिल्ड लस घेतलेल्यांपैकी काहीजणांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रकार काही देशांत घडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारही चिंतित झाले आहे. देशात लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी वापरल्या जात आहेत.  या लसींचे लोकांवर काय परिणाम होतात याकडे केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. (attention to the effects of covacin and Covishield the highest priority of the central government on the safety of citizens)कोविशिल्ड लसीचे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन केले जाते, तर कोव्हॅक्सिन लस हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे.  या लसींच्या आपत्कालीन वापराला देशातील औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. कोरोना साथीसंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने नेमलेल्या कृती गटाचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, केंद्र सरकार कोणत्याही एका विशिष्ट लसीवर लक्ष ठेवत नाही. लसीमुळे सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम जाणवतात. लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे प्रकृती खूपच बिघडली तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते किंवा ती व्यक्ती मरण पावते. अतिशय गंभीर स्वरूपाच्या दुष्परिणामांवर केंद्र सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. 

जगभरातील घटनांचा अभ्यासआयसीएमआरने नेमलेल्या तज्ज्ञांच्या कृती गटाचे आणखी एक सदस्य डॉ. राजिंदर धमिजा यांनी सांगितले की, कोरोना लसीकरण मोहीम राबविताना सुरक्षिततेचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत. जगभरात लसी घेतल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाला होता, पण या मृत्यूला लस कारणीभूत असल्याचे ठोस पुरावे हातात आलेले नाहीत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस