शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विवाह इच्छा अपूर्ण; एकत्र मृत्यूचा प्रयत्नही फसला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 08:12 IST

प्रेयसीचा मृत्यू; प्रियकर गंभीर जखमी

ठळक मुद्देप्रेयसीचा मृत्यू; प्रियकर गंभीर जखमी

एस. पी. सिन्हानवी दिल्ली : आपला विवाह होऊ  शकणार नाही आणि आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही, हे लक्षात आल्याने प्रेमी युगुलाने आत्महत्येचा निर्णय घेतला. त्या दोघांनी पाटण्याजवळच्या फतुआ रेल्वे स्थानकापाशी धावत्या गाडीखाली उड्या मारल्या. युवती जागीच मरण पावली, पण तरुणाचा उजवा हात पूर्ण कापला गेला. डोक्याला खूपच मार लागला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नीशा कुमारी व दीपक कुमार हे दोघे एकाच गावातील रहिवासी. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. पण दोघांच्या घरातून विरोध होता. आपला विवाह होणार नसेल, तर आपण जिवंतच राहायचे नाही, असे त्यांनी ठरविले आणि मंगळवारी सकाळी धावत्या गाडीखाली दोघांनी उड्या घेतल्या. युवतीच्या अंगावरून गाडी गेल्याने ती जागीच ठार झाली. पण हात कापला जाऊन आणि डोक्याला जबर मार लागूनही दीपक कुमार जिवंत राहिला. दोघांच्या ओळखपत्रांमुळे त्यांचे नाव, गाव याची माहिती पोलिसांना समजली.

या युगुलाचे विवाहाचे स्वप्नही अपूर्ण राहिले आणि एकत्र मरण्याची इच्छाही अपुरी राहिली. ही बातमी कळताच गावकऱ्यांना धक्काच बसला. दोघांचे नातेवाईकही आता रडत आहेत. पोलीसही अधिक चौकशी करण्यासाठी गावात दाखल झाले आहेत.

टॅग्स :marriageलग्नDeathमृत्यूrailwayरेल्वे