शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

अटेम्प्ट टू मर्डर, गुन्हेगारी धमकी अन्...! भाजपनं राहुल गांधींविरोधात या 6 कलमांखाली दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:43 IST

महत्वाचे म्हणजे, भाजपने आपल्या तक्रारीत राहुल गांधींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे.

संसदभवन परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या धक्का-बुक्की प्रकरणावरून आता राजकारण जबरदस्त तापले आहे. भाजपने राहुल गांधींवर आपल्या खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. यात दोन खासदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय एका महिला खासदारानेही राहुल गांधींवर आरोप केले आहेत. या धक्काबुक्की प्रकरणानंतर, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने आपल्या तक्रारीत राहुल गांधींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

भाजपने संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, "त्यांना (राहुल गांधी) कायद्याचे उल्लंघन करण्याची सवय आहे. त्यांनी केलेल्या धक्का-बुक्कीत दोन खासदार खाली कोसळून जखमी झाले आहेत. हत्येचा प्रयत्नाशी संबंधित कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीएनएसचे कलम १०९ अन्वये तक्रार देण्यात आली आहे. या घटनेनंतरही राहुल गांधींचा अहंकार कमी झालेला नाही. ते खासदारांना न भेटताच निघून गेले. ते स्वतःला कायद्यापेक्षाही मोठे समजतात.

यासंदर्भात, काँग्रेसनेही तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात बोलताना ठाकूर म्हणाले, 'उल्टा चोर कोतवाल को डांटे'. हे तेच राहुल गांधी आहेत, जे आपल्याच सरकारमध्ये, आपल्याच सरकारचा अध्यादेश फाडतात. ही तीच काँग्रेस आहे, जीने बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला.

BNS च्या या कलमांखाली करण्यात आलीय राहुल गांधीं विरोधात तक्रार -- कलम 109: हत्येचा प्रयत्न- कलम 115: जाणून बुजून दुखापत करणे- कलम 117: जाणून बुजून गंभीर दुखापत करणे- कलम 121: सरकारी कर्मचाऱ्याचे त्याच्या कर्तव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी दुखापत करणे- कलम 351: गुन्हेगारी धमकी- कलम 125: इतरांची सुरक्षा धोक्यात आणणेमुकेश राजपूत यांचे ब्लड प्रेशर आद्यापही हाय -  जखमी भाजप खासदारांच्या प्रकृतीसंदर्बात बोलताना आरएमएल एमएस डॉ. अजय शुक्ला म्हणाले, "प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोघांनाही औषध देण्यात आले आहे. राजपूत यांचे ब्लड प्रेशर अद्यापही हाय आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सारंगी जी एक वयस्कर व्यक्ती आहेत आणि जेव्हा धक्काबुक्की होते तेव्हा रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका अथवा स्ट्रोकही येऊ शकतो. सारंगी हे हृदयरोगी आहे. आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करत आहोत."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाAnurag Thakurअनुराग ठाकुरParliamentसंसदPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिसMember of parliamentखासदार