शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sugarcane Rate: ऊसदरासाठी आंदोलनस्थळी शेतकऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, प्रशासनाची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:46 IST

आज अथणी बंदची हाक

अथणी : यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिले बिल ३ हजार ५०० रुपये द्यावे यासाठी गोरलापूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. सोमवारी अलकनूर (ता. रायबाग) येथील शेतकरी लकाप्पा गुणधर (वय २५) यांनी आंदोलनस्थळी विषारी द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली.आंदोलनस्थळी गुणधर यांनी अचानक विषारी द्रव पिल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना हारुगेरी येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, मागितलेला दर दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असून रात्रं-दिवस आंदोलन सुरू आहे.पण, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सोमवारी आंदोलन चिघळले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गोळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. प्रतिटन ३ हजार २०० रुपये दर देण्याची घोषणा केली, पण शेतकऱ्यांनी हा दर अमान्य केला.बेळगावचे खासदार, माजी मुख्यमंत्री जगदीश शट्टर यांनीही आंदोलकांची भेट घेतली. सरकार ऊसदरावर तोडगा काढण्यास विलंब करीत असल्याने शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी मागितलेला ३ हजार ५०० रुपये दर रास्त आहे, तो शासन व कारखान्यांनी मान्य करावा, अन्यथा आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीस प्रशासन व कारखाने जबाबदार राहतील. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.दरम्यान, शेतकरी नेते शशिकांत पडसलगी, चनाप्पा पुजारी, एम. सी. तांबोळी, आदींनी मंगळवारी (दि. ४) अथणी शहर बंदची हाक दिली आहे. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer attempts suicide at sugarcane price protest; chaos ensues.

Web Summary : A farmer attempted suicide at a protest demanding ₹3,500/ton for sugarcane. The incident triggered chaos, prompting hospitalisation. Protests continue, demanding fair prices. Leaders threaten a bandh if demands aren't met, highlighting government inaction and potential losses for factories.
टॅग्स :sugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेbelgaonबेळगावFarmerशेतकरीagitationआंदोलन