संस्कृत भाषेला पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 17, 2015 19:37 IST2015-12-17T19:37:36+5:302015-12-17T19:37:36+5:30
भारतातील सर्वात जुनी असलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणन्यासाठी तिला पुनर्जिवित करण्यासाठी राकेश कुमार मिश्रा हे दिवसातील १२ तास संगणकावर बसून मेहनत करत आहे

संस्कृत भाषेला पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न
ऑनलाइ लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - भारतातील सर्वात जुनी असलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणन्यासाठी तिला पुनर्जिवित करण्यासाठी राकेश कुमार मिश्रा हे दिवसातील १२ तास संगणकावर बसून मेहनत करत आहे. संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणने एवढाच त्यांचा ध्यास आहे. भारतात अनेक भाषा आहेत, प्रत्येक प्रांताची मातृभाषा आहे पण संस्कृत ही भारतातील सर्वात जुनी मुख्य भाषा आहे. भातातील १४,१०० लोक फक्त संस्कृत भाषा बोलतात हे भारताच्या एकून लोकसंखेच्या फक्त एक टक्के येवढ प्रमाण आहे.
भारतात अनेक भाषा प्रचलित आहेत त्यापैकी सर्वात जुनी संस्कृत भाषा आहे. ४००० वर्ष जुनी प्रचीन असलेली संस्कृत भाषा काळानुरुप ऱ्हास होत चालली आहे. प्राचीन काळातील सर्व धर्मग्रंथ याच भाषेतून लिहिले गेले. दुर्दैवाने पाश्चिमात्य संस्कारामुळे संस्कृत भाषा मृतवत होत आहे. पुर्वी ह्या भाषेवर मोजक्याच लोकांच आधिराज्य होत पण काळानुरुप ती सर्वपरिचित आणि सर्वांच्या आंगवळणी पडली पण पाश्चिमात्य भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे संस्कृत भाषेचा ऱ्हास होत चालल्याचं दिसतं आहे.