अतिरेक्यांचा घातपाताचा कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 06:05 IST2020-11-21T06:04:33+5:302020-11-21T06:05:18+5:30

जम्मूतील कारवाईनंतर दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांत रेड अलर्ट 

The attack of the terrorists was foiled | अतिरेक्यांचा घातपाताचा कट उधळला

अतिरेक्यांचा घातपाताचा कट उधळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अमेरिकेप्रमाणे भारतावरही मोठा हल्ला करण्याचा कट भारतीय जवानांनी सीमेवर उधळून लावल्यानंतर मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणेने रेड अलर्ट जारी केला. दोन्ही शहरांवरील सीमेवर मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू झाली आहे. दिल्लीतील अनेक हाॅटेल्समध्ये पोलिसांनी पाहणी करून तेथे वास्तव्यास असलेल्यांची कागदपत्रे तपासली. परदेशी नागरिकांचा ठावठिकाणादेखील दिल्ली पोलिसांनी तपासून पाहिला आहे.


जम्मू-काश्मीरमधील नगरोटातील एन्काउंटरमध्ये जैश- ए- मोहम्मदच्या चार अतिरेक्यांना जवानांनी ठार मारले. पंतप्रधान नरेंद्र यांनी ट्वीट करून ही माहिती देताना पाकवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्री व सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. 

कराचीत बनविलेली औषधे, बूट सापडले
नागरोटातील चकमकीत ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा तसेच कराचीत बनविलेली औषधे, त्या शहरात खरेदी केलेले बूट सापडले आहेत. 

Web Title: The attack of the terrorists was foiled