वाळू तस्करांचा नायब तहसीलदारांवर हल्ला तिघांवर गुन्हा : संगमनेरमधील घटना

By Admin | Updated: August 10, 2015 00:28 IST2015-08-10T00:28:00+5:302015-08-10T00:28:00+5:30

संगमनेर (अहमदनगर) : वाळू तस्करांनी महसूल भरारी पथकाच्या निवासी नायब तहसीलदारासह तलाठ्यावर जीवघेणा हल्ला करून जबर मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील चिखली येथे आढळा नदीपात्रात घडला.

The attack on the sand smugglers of Tahsildars: The incident in Sangamner | वाळू तस्करांचा नायब तहसीलदारांवर हल्ला तिघांवर गुन्हा : संगमनेरमधील घटना

वाळू तस्करांचा नायब तहसीलदारांवर हल्ला तिघांवर गुन्हा : संगमनेरमधील घटना

गमनेर (अहमदनगर) : वाळू तस्करांनी महसूल भरारी पथकाच्या निवासी नायब तहसीलदारासह तलाठ्यावर जीवघेणा हल्ला करून जबर मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील चिखली येथे आढळा नदीपात्रात घडला.
शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री चिखली शिवारातील आढळा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळूचा उपसा केला जात असल्याची गुप्त माहिती महसूलच्या भरारी पथकाचे प्रमुख निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना मिळाली. त्यांनी दीड वाजेच्या सुमारास तलाठी पोमल तोरणे यांच्यासह नदीपात्रात छापा टाकला. छाप्यात वाळुने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र वाळू तस्कर आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख यांनी टॅक्टर तहसील कार्यालयात नेण्यास नकार दिला. दोघांनी तोरणे व जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जाधव यांच्याकडील २४ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून ट्रॅक्टर घेऊन दोघे फरार झाले. वाळू तस्करांच्या मारहाणीत तोरणे व जाधव जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती समजताच मध्यरात्री तहसीलदार शरद घोरपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आयुब व लतिफ शेख तसेच त्यांची आई अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
------------

Web Title: The attack on the sand smugglers of Tahsildars: The incident in Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.