रामदेवबाबा यांनी ‘भारत माता की जय’ म्हणण्यासंबंधी वादात नव्याने भर घालणारे विधान केल्यानंतर राजकीय पक्षांनी चौफेर टीका चालविली आहे.रामदेवबाबा यांचे विधान म्हणजे हिंसक कृत्य असून ती जाहीर धमकी ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामदेवबाबांवर कारवाई करावी, असे काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी म्हटले. अशाप्रकारचे वक्तव्य म्हणजे जनतेच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या समस्येबाबत लक्ष विचलित करण्यासाठी हेतुपुरस्सर आखलेले डावपेच असल्याचे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी नमूद केले. मोदी सरकारने हिंदुत्ववादी घटकांना या नाऱ्याचा वापर करण्याचा जणू परवानाच दिला आहे. त्यामागे देशाला एकसंघ ठेवण्याऐवजी विभाजित करण्याचा उद्देश आहे, असे वृंदा करात म्हणाल्या.
रामदेवबाबांच्या विधानावर हल्ला
By admin | Updated: April 5, 2016 00:11 IST