शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

जेएनयूमधील हल्ला:३ संशयितांची चौकशी; प्राध्यापक, विद्यार्थी यांचा वर्गांवरील बहिष्कार सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 4:11 AM

पंकज मिश्रा, वास्केर विजय मेच व आयशी घोष या तिघांवर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. हल्ल्याप्रकरणी नऊ संशयितांची छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली होती

नवी दिल्ली : फीवाढीच्या विरोधात जेएनयूमध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांनी वर्गांवर घातलेला बहिष्कार सोमवारीही कायम होता. प्रशासन आमचे प्रश्न सोडवेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ५ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या पथकाने विद्यापीठात जाऊन सोमवारी जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह तीन विद्यार्थ्यांची चौकशी केली.

पंकज मिश्रा, वास्केर विजय मेच व आयशी घोष या तिघांवर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. हल्ल्याप्रकरणी नऊ संशयितांची छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली होती. त्यात या तिघांचा समावेश आहे. हल्ल्यात आयशी घोष जखमी झाली होती. सेमिस्टर रजिस्टर प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याच्या मुद्यावरून जेएनयूमध्ये वातावरण तंग होते. त्याची परिणती हिंसक हल्ल्यात झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हल्ला घडविणाऱ्यातील नऊपैकी सात जण डाव्या विचारसरणीचे, तर अन्य दोन अभाविपचे असल्याचा कयास आहे.

अभाविपचा दावा करणाºया अक्षत अवस्थी याने जेएनयूतील हल्ला आपणच घडविल्याचा दावा एका नियतकालिकाने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये केला होता. हाणामारी करताना चेहरा झाकण्यासाठी अक्षतने आपला मित्र रोहित शहा याच्याकडून हेल्मेट घेतले होते. जेएनयूत झालेल्या हल्ल्यात चेहरा झाकलेल्या कोमल शर्मा या विद्यार्थिनीची पोलिसांनी ओळख पटविली आहे. कोमल ही दौलतराम कॉलेजची विद्यार्थिनी आहे. ती, अक्षत व रोहितने चौकशीसाठी हजर राहावे याकरिता त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भातील (सीएए) शंकानिरसन करण्यासाठी पाच कडवे टीकाकार निवडून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाहिनीवर करावा, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम पाहून जनता आपले मत बनवील, असेही त्यांनी सांगितले.

चिदंबरम यांनी यासंदर्भात केलेल्या एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझ्या मागणीला पंतप्रधान मोदी प्रतिसाद देतील अशी आशा वाटते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नव्हे, तर देण्यासाठी बनविला आहे असे मोदी म्हणतात. एनआरसी, एनपीआरशी जोडला जाणारा हा कायदा देशातील अनेक लोकांचे नागरिकत्व हिरावून घेईल अशी शंका आहे. मोदी जाहीर सभांतून, कार्यक्रमांतून या कायद्याचे समर्थन करीत आहेत.कुलगुरूंवर कारवाईची मागणी

  • फीवाढीचा निषेध करीत जेएनयूतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आज वर्गांवर सामूहिक बहिष्कार टाकला. प्राध्यापकांनी वर्गावर शिकविण्यासाठी हजर व्हावे, असा जेएनयू विद्यापीठ प्रशासनाने दिलेला आदेश प्राध्यापकांनी धुडकावून लावला आहे.
  • जेएनयूमधील विद्यार्थी व शिक्षकांना भेडसावणाºया प्रश्नांची सोडवणूक न झाल्यामुळे वर्गांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
  • कुलगुरू एम. जगदीशकुमार यांना बडतर्फ करावे व त्यांच्यावर हल्ल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्राध्यापक करीत आहेत. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण नसल्याची तक्रार जेएनयूटीएलचे अध्यक्ष डी. के. लोबियाल यांनी केली आहे.
टॅग्स :jnu attackजेएनयू