जोड बातमी
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30

जोड बातमी
>चौकट : साहित्य महामंडळाची निवडणूक असो अथवा साहित्य संमेलनाची, त्या निवडणुकीला सामोरे जाण्याची वैयक्तिक इच्छाशक्ती असेल तर काहीही अडचण येते, असे मला वाटत नाही. निवडणुकीला उभे राहताना अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर ठाकलेले असतात. या प्रश्नांवर मात करत महिलांनी आपणहून पुढे आले पाहिजे. तरच, त्यांचा टिकाव लागेल. महामंडळाची पदाधिकारी असताना कोणत्याही महिला साहित्यिकेला निवडणुकीचा उभे राहण्यास सांगणे, हा माझा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीची प्रक्रिया राबवत असताना पदाधिका-यांनी तटस्थ राहणे अपेक्षित असते. अशा वेळी महिला साहित्यिक साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी आपणहून पुढे आल्या तर महामंडळ त्यांचे स्वागतच करेल. मी अध्यक्ष नसताना आशा मोघे, मंगला गोडबोले, अरुणा ढोरे यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा आग्रह केला होता. माझ्या भाषणांमध्ये मी अरुणाचा भावी संमेलनाध्यक्ष असा उल्लेखही केला होता. पण, आता महामंडळाची अध्यक्ष झाल्यानंतर निवडणुकीसाठी आलेल्या अर्जाचे स्वागत करणे आणि तटस्थपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे माझे काम आहे. प्रभा गणोरकर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या साहिल्या तेव्हा महामंडळाने त्यांचे स्वागतच केले होते. - माधवी वैद्य, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेमहामंडळाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना मतदानाच्या प्रचारामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे महिला साहित्यिकेला प्रोत्साहन देणे महामंडळाच्या पदाधिका-यांच्या नियमावलीत बसत नाही. याऐवजी साहित्य संस्था महिला साहित्यिकांना प्रोत्साहन देऊ शकतात. प्रभा गणोरकर, प्रतिमा इंगोले या महिला निवडणुकीला ऊभ्या राहिल्याच होत्या. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महिला साहित्यिक उदासिन आहेत, असे म्हणता येणार नाही. निवडणुकीला सामोरे जाणे अथवा न जाणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.- उषा तांबे, माजी अध्यक्ष, मुंबई मराठी साहित्य संघ