अपहृत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: August 27, 2015 00:20 IST2015-08-27T00:20:32+5:302015-08-27T00:20:32+5:30

नाशिक : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे अपहरण केल्यानंतर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Atrocities on kidnapped minors | अपहृत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अपहृत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शिक : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे अपहरण केल्यानंतर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मुलासह त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी परिसरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून संशयित अभिषेक दिलीप भामरे याने १५ ते १८ ऑगस्टदरम्यान चारुलता भामरे व दिलीप भामरे यांच्या मदतीने अपहरण केले़ तसेच तिला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला़ या घटनेची वाच्यता करू नये यासाठी संशयितांनी मुलीला तिच्या आई-वडील व भावास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी या तिघा संशयितांविरोधात अपहरण व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Atrocities on kidnapped minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.