शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
3
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
4
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
5
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
6
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
7
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
8
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
10
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
11
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
12
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
13
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
14
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
15
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
16
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
17
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
18
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
19
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
20
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:05 IST

Atishi’s Delhi Cabinet : मंत्रिमंडळात अतिशी यांच्यासह ५ जुने मंत्री कायम राहणार असून सध्या १ मंत्रिपद रिक्त राहणार आहे.

Atishi’s Delhi Cabinet : नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, आतिशी यांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत नव्या नावाचा समावेश होणार आहे. सुलतानपूर माजराचे आमदार मुकेश अहलावत एससी-एसटी कोट्यातून दिल्ली सरकारमध्ये मंत्री होणार आहेत. तर मंत्रिमंडळात अतिशी यांच्यासह ५ जुने मंत्री कायम राहणार असून सध्या १ मंत्रिपद रिक्त राहणार आहे. आतिशी, सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, गोपाल राय, इम्रान हुसेन, मुकेश अहलावत यांच्या नावांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असून एक मंत्रीपद अजूनही रिक्त राहणार आहे.

कोण आहेत मुकेश अहलावत?मुकेश अहलावत हे सुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुकेश अहलावत यांनी भाजपचे उमेदवार राम चंदर छावरिया यांचा पराभव केला होता. मुकेश अहलावत यांनी भाजप उमेदवाराचा ४८,०५२ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत मुकेश अहलावत यांना ७४, ५७३ मते मिळाली होती, तर भाजपचे उमेदवार राम चंदर छावरिया यांना २६,५२१ मते मिळाली होती. दरम्यान, मुकेश अहलावत यांना आता दिल्ली सरकारमध्ये एससी-एसटी कोट्याअंतर्गत मंत्री करण्यात येणार आहे. मात्र, चार मंत्री तेच राहणार असून, मंत्रिमंडळातील एक जागा अद्याप रिक्त आहे.

आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथअरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आता आतिशी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना २१ सप्टेंबरला आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आतिशी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. यासोबतच आम आदमी पक्षाच्या काही आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यावेळी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. तसेच, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आम आदमी पक्षाच्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी