शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Atiq Ahmed Murder: अतिकची वैद्यकीय तपासणी रात्री कशी? सिब्बल यांनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, ही तर ‘संपविण्याची कला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 06:54 IST

Atiq Ahmed Murder: माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी सोमवारी अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी सोमवारी अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आपत्कालीन परिस्थिती नसताना पोलिसांनी त्यांना रात्री १० वाजता वैद्यकीय तपासणीसाठी का नेले व पत्रकारांना त्यांच्याशी कसे बोलू दिले, असा सवाल त्यांनी केला.  

अतिकच्या कासारी-मसारी वस्तीत शुकशुकाटप्रयागराज : प्रयागराजमध्ये हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झालेला माफिया अतिक अहमदची वस्ती कासारी-मसारी आणि त्याचा बालेकिल्ला असलेल्या शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात शुकशुकाट पसरला असून, चौकाचाैकांत पोलिसांचा खडा पहारा दिसून येत आहे. रज्जुरूपपूर, कारली आणि खुलदाबादमध्ये मोजकीच दुकाने उघडली. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील चार-पाच मुस्लीमबहुल भागातील चौकाचौकांत कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. संवेदनशील परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. संपूर्ण शहरात अजूनही इंटरनेट सेवा पूर्ववत झालेली नाही. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांचा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे न्यायालयाला सांगून पोलिसांवर कारवाईची मागणी आपण करणार आहोत, असे अतिकचे वकील मनीष खन्ना यांनी सांगितले.

यूपीत ‘जंगलराज’ आहे : ललन सिंह पाटणा : प्रयागराजमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या झाल्याच्या घटनेवर जनता दल-संयुक्तचे अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी सोमवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात जंगलराज आहे. बिहारमध्ये जंगलराज असल्याचा गळा काढणाऱ्या भाजपवाल्यांना उत्तर प्रदेशचे पोलिस कोठडीतील आरोपींना बिनधास्त मारू देत आहेत हे मात्र दिसत नाही.

एका ट्वीटमध्ये सिब्बल म्हणाले, ‘अतिक आणि अश्रफ (संपविण्याची कला). प्रश्न :n वैद्यकीय तपासणी रात्री १० वा.?n वैद्यकीय आणीबाणी नाहीn बळी पायी का नेण्यात आलेn माध्यमांसाठी खुले?n घटनास्थळी मारेकरी एकमेकांना अनोळखी होते का?n ७ लाखांवरील शस्त्रेn शूट करण्यासाठी चांगले प्रशिक्षित!n तिघेही शरण आले.

अतिक, अशरफ हत्येच्या तपासासाठी एसआयटीउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माफिया आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफच्या हत्येचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली.मारेकऱ्यांना प्रयागराजहून प्रतापगड तुरुंगात हलविलेn अतिक व त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना सोमवारी प्रयागराज मध्यवर्ती कारागृहातून प्रतापगड जिल्हा कारागृहात हलवले आहे. n हमीरपूर येथील सनी (२३), बांदा येथील लवलेश तिवारी (२२) आणि कासगंज येथील अरुण कुमार मौर्य (१८) यांना प्रशासकीय कारणास्तव मध्यवर्ती कारागृह, प्रयागराज येथून जिल्हा कारागृह प्रतापगड येथे हलविण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिकवर हल्ल्यासाठी असा ठरला प्लॅन...कासगंजचा अरुण मौर्य, बांदाचा लवलेश तिवारी आणि हमीरपूरचा सनी सिंग हे तिघेही १३ एप्रिल २०२३ रोजी प्रयागराजला पोहोचले. इथल्या एका लॉजमध्ये त्यांनी रूम बुक केली. तिघांचेही उद्दिष्ट एकच होते. काहीतरी मोठे करून गुन्हेगारी जगतात नाव कमवायचे. या तिघांनी आधीच हत्येची योजना आखली होती, फक्त योग्य क्षणाची ते वाट पाहत होते. अतिकच्या जवळ जाण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे पत्रकार बनणे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तिघांनी डमी कॅमेरे व बनावट माईक आयडीची व्यवस्था केली. यानंतर शनिवारी दिवसभर तिघांनीही पत्रकारांवर बारीक लक्ष ठेवले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशkapil sibalकपिल सिब्बल