शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Atiq Ahmad Shot Dead: अतिक-अशरफ हत्याकांडानंतर केंद्राचा मोठा निर्णय; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 14:38 IST

Atiq-Ashraf Shot Dead News: अतिक आणि अशरफची हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपींनी सरेंडर केले आहे.

Atiq Ahmad Shot Dead:उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची मीडियासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी दोघांवर बेछुट गोळीबार केली. सुदैवाने यावेळी इतर कोणालाही गोळी लागली नाही. दरम्यान, या घटनेनंतर केंद्र सरकार पत्रकारांच्या सुरक्षेसाठी SOP तयार करणार आहे.

पत्रकार बनून आलेल्या तिघांनी अतिक आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांनी पोलिसांसमोर एका मागून एक गोळ्या चालवल्या. सुदैवाने इतर कोणालाही गोळी लागली नाही. या घटनेनंतर सरकार अलर्ट झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय (MHA) पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पत्रकारांना सुरक्षा देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेदोन भावांची कॅमेऱ्यासमोर गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर यूपी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, ही घटना पोलिसांच्या संरक्षणात घडली. यामुळे यूपीत गुन्हेगारांचे मनोबल उंचावले गेले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी एकूण 18 राउंड गोळीबार केला. गोळी लागल्याने दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. 

सर्वत्र पोलीस तैनातयावेळी प्रयागराजमधील रस्त्यांवर शांतता आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दुकानेही बंद आहेत. प्रत्येक कारवाईवर पोलिसांची नजर आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडून पोलिसांना कडक देखरेखीच्या सूचना मिळाल्या आहेत. काल रात्री उशिरापर्यंत राज्यात बैठकांचा फेरा सुरू होता. आज शवविच्छेदन वेळेवर झाले तर दोघांचा दफनविधी होऊ शकतो. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसJournalistपत्रकारmafiaमाफिया