शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 15:19 IST

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

जयपूर - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. राजस्थानमध्ये त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.  मात्र या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही दोन ते तीन वेळा अशाच प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. 

न्यूज 18च्या वृत्तानुसार जयपूर, जोधपूरसहीत संपूर्ण शहरात अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधानाचे वृत्त व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले. या वृत्ताला कोणताही दुजोरा मिळालेला नसताना लोकांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवातही केली.  यापूर्वी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर स्थानिकांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदवली. यानंतर जिल्हाधिका-यांनी शाळेचे प्राध्यापक कमलकांत दास यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. 

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी आजारी आहेत. अशातच वारंवार त्यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे भाजपा सूत्रांकडून सांगण्यात आले असून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही करण्यात आले आहे. तसेच खात्री केल्याशिवाय असे मेसेज पाठवू नका फॉरवर्ड करू नका असेही भाजपाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीBJPभाजपा