शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाज मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीनं पळाला; काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 18:38 IST

पीनएबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला अँटिग्वाचं नागरिकत्व मिळालं आहे

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीनं देशाबाहेर पळाला, असा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारणीची आज दुसरी बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. घोटाळेबाज मेहुल चोक्सीला पळून जाता यावं, यासाठी मोदी सरकारनं मदत केली, असं सुरजेवाला म्हणाले. पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये आहे. यावरुन कालच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर आता काँग्रेस प्रवक्त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. 'घोटाळेबाजांना सुखनैव पळून जाता यावं, यासाठी मोदी सरकारकडून मदत केली जात आहे. चोक्सीला अँटिग्वाचं नागरिकत्व कसं मिळालं, हे आपण सर्व पाहातच आहोत. चोक्सीला पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं कशी मदत केली, याची माहिती आता समोर आली आहे,' असं काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले. रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारसोबतच सेबीवरदेखील टीका केली. या प्रकरणात सेबीनं सकारात्मक अहवाल दिलाच कसा?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सेबीनं दिलेल्या अहवालामुळेच चोक्सीला अँटिग्वाचं नागरिकत्व मिळालं आहे. चोक्सीला देशाबाहेर पळून जाऊ देण्यात मोदी सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीदेखील फरार आहे.  

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा