परदेशांत लपलेल्या १९ खलिस्तानी दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त होणार; एनआयए अॅक्शनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 23:25 IST2023-09-24T23:25:05+5:302023-09-24T23:25:24+5:30
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत ज्या लोकांची नावे आहेत, त्या सर्वांवर देशविरोधी कारवायांचा आरोप आहे. अनेकवेळा केंद्र सरकारने हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले आहेत.

परदेशांत लपलेल्या १९ खलिस्तानी दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त होणार; एनआयए अॅक्शनमध्ये
खलिस्तानी दहशतवाद्यांवरून कॅनडा आणि भारतामध्ये तणाव वाढला आहे. अशातच एनआयएने परदेशांत लपलेल्या दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि दुबईमध्ये लपलेल्या 19 खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावरील केसेसचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. एनआयएच्या पथकांनी प्रकरणांचा अभ्यास सुरू केला आहे. या जुन्या प्रकरणांत त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत ज्या लोकांची नावे आहेत, त्या सर्वांवर देशविरोधी कारवायांचा आरोप आहे. अनेकवेळा केंद्र सरकारने हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडले आहेत.
फरार झालेल्यांच्या यादीत परमजीत सिंग पम्मा, वाधवा सिंग बब्बर उर्फ चाचा, कुलवंत सिंग, जेएस धालीवाल, सुखपाल सिंग, हरप्रीत सिंग उर्फ राणा, सरबजीत सिंग, कुलवंत सिंग उर्फ कांता, हरजप सिंग उर्फ जप्पी सिंग, रणजीत सिंग नीता, गुरमीत सिंग अली यांचा समावेश आहे. बग्गा उर्फ बाबा, गुरप्रीत सिंग उर्फ बागी, जसमीत सिंग हकीमजादा, गुरजंत सिंग ढिल्लोन, लखबीर सिंग रोडे, अमरदीप सिंग पुरेवाल, जतिंदर सिंग ग्रेवाल, दपिंदरजीत आणि एस हिम्मत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.
शनिवारी एनआयएने बंदी घातलेल्या शिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांची चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त केली होती. तर हरदीप सिंह निज्जरची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.