शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

विधानसभा निवडणुका म्हणजे लोकसभेची सेमीफायनल नव्हे; २० वर्षांपूर्वी काय घडले हाेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 09:36 IST

भाजपचा २०१८ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडसह पाच वर्षे सत्तेत असलेल्या सर्व पाच राज्यांत पराभव झाला होता.

हरीश गुप्तानवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी हाती येणार असून, अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मे २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या या सेमीफायनल असतील. या पाच राज्यांत लोकसभेच्या ८३ जागा आहेत आणि या राज्यांमध्ये विजय मिळवणाऱ्यास पुढे विजय मिळवता येऊ शकतो. तथापि, या राज्यांतील भूतकाळातील विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास हा अंदाज नाकारला जाऊ शकतो. 

विधानसभेत पराभव मात्र, लाेकसभेत विजयभाजपचा २०१८ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडसह पाच वर्षे सत्तेत असलेल्या सर्व पाच राज्यांत पराभव झाला होता. तरीही त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत यापैकी तीन राज्यांनी भाजपला लक्षणीय विजय मिळवून दिला होता. भाजपने तीन राज्यांत ६५ पैकी ६१ जागा जिंकल्या होत्या आणि तेलंगणात १७ पैकी चार जागा जिंकून खाते उघडले होते. मिझोराममधील एकमेव लोकसभेची जागा प्रादेशिक पक्षाकडे गेली होती. हा पक्ष नंतर एनडीएमध्ये सहभागी झाला होता. 

२० वर्षांपूर्वी काय घडले हाेते?२००३ मध्येही भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. परंतु, २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा पराभव झाला. २००८ मध्ये भाजपने मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपने पुन्हा विजय मिळवला होता. परंतु, २००९ मध्ये काँग्रेसला नामोहरम करण्यात अपयश आले.

काँग्रेससाठी हे महत्त्वाचे...पाच विधानसभांच्या निवडणुकांची बाब वगळता २०२४ मध्ये काँग्रेससाठी दोन घटक चांगले काम करू शकतात. एक म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड आणि दुसरे म्हणजे भारत जोडो यात्रेनंतर ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या आलेखात झालेली लक्षणीय सुधारणा. खरगे दलित समाजातील असल्यामुळे भाजप त्यांच्यावर वैयक्तिक हल्लाबोल करण्याचे टाळत आहे व अत्यंत सावध पावले टाकत आहे. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन इंडिया आघाडीचे सहकारी पक्षही त्यांचा आदर करताना दिसतात. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९च्या निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्याप्रमाणे निवडणूक कशी वळवायची, हे माहिती आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक