शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

Video - होम-हवन, ढोल-ताशे आणि 'रामराज्य' पोस्टर्स; निकालापूर्वी काँग्रेसचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 10:07 AM

Election Results 2023: निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. याच दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. 

निकाल येण्यापूर्वीच लोक ढोल वाजवून विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यांच्या हातात भगवान रामाचा फोटो असलेले पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. यासोबतच त्यांनी आपला पक्ष चारही राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टर्सवर भगवान रामाचे फोटो आहेत. पोस्टर्सवर "राहुल प्रियंका का देखो खेल, भाजपा की बना दी रेल" असं म्हटलं आहे. तसेच पोस्टरवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या फोटोसह अनेक घोषणा देखील लिहिल्या आहेत. सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे.  "अबकी बार झोला उठाए मोदी सरकार"; "भारत का विश्वास है, राहुल-प्रियंका" असं देखील पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेसने बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह आहे. निवडणूक निकालापूर्वीच मिठाई वाटपाची पूर्ण तयारी दिसून येत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस