शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पाच राज्यातील निवडणुकांसाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन' तयार, 'या' फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:28 IST

Assembly Election 2023: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिजोरममध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

Assembly Election and BJP Planning: या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये (मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम) विधानसभा निवडणुका होणार आहेत. लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि निवडणूक रणनीतीही ठरवण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष, वसुंधरा राजे सिंधिया, राजेंद्र राठोड, सतीश पुनिया, अरुण सिंग, विजया रहाटकर, सहप्रभारी नितीन पटेल, गजेंद्र सिंह शेखावत, राज्यवर्धन सिंह राठोड आदी दिग्गज नेते बैठकीला उपस्थित होते. 

जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजेमीडिया रिपोर्टनुसार, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. यानुसार, राज्यात मोठी जबाबदारी मिळवण्यास इच्छूक असलेले किंवा स्वत:ला दावेदार म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व बड्या नेत्यांना आधी निवडणुकीच्या रिंगणात उतरुन जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल.

आमदारांच्या संख्येच्या आधारे जबाबदारी दिली जाईलभारतीय जनता पक्षाने निवडणुकीत बहुमताचा आकडा पार केल्यास संबंधित राज्यातील नेत्यांची कामगिरी आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेऊन त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्याबाबत विचार केला जाणार आहे. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय होणार आहे.

इतर राज्यांमध्ये मध्य प्रदेशचा फॉर्म्युलामध्य प्रदेशप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत भाजप इतर राज्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना किंवा केंद्रीय मंत्र्यांना तिकीट देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपने नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंह कुलस्ते या केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. याशिवाय संघटनेचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्यासह आठ खासदारांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ या वर्षी डिसेंबर ते जानेवारी 2024 पर्यंत आहे. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारी, मध्य प्रदेश 6 जानेवारी 2024, राजस्थान 14 जानेवारी 2024, तेलंगणा 16 जानेवारी 2024 आणि मिझोराम 17 डिसेंबर रोजी संपेल. 

 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानChhattisgarhछत्तीसगडTelanganaतेलंगणाmizoram-pcमिजोरम