Assembly Election 2022: मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा की नको? काँग्रेससमोर आव्हान, पाच राज्यांत विचारमंथन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:51 AM2022-01-31T06:51:16+5:302022-01-31T06:52:02+5:30

Assembly Election 2022: पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच सांगितले होते. काँग्रेसने अशी घोषणा केल्यास उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा लागेल. 

Assembly Election 2022: Should Chief Ministerial candidate be declared or not? Challenge before Congress, brainstorming in five states | Assembly Election 2022: मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा की नको? काँग्रेससमोर आव्हान, पाच राज्यांत विचारमंथन सुरू

Assembly Election 2022: मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा की नको? काँग्रेससमोर आव्हान, पाच राज्यांत विचारमंथन सुरू

googlenewsNext

- व्यंकटेश केसरी
 नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी स्वारस्य दाखवीत नाही, तर उत्तर प्रदेशात सत्तेसाठी अप्रासंगिक असल्याची जाणीव आम आदमी पार्टीला झाली आहे. मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपाही पंजाब विधानसभा निवडणूक मनापासून लढवीत नाही, तर दुसरीकडे, काँग्रेसला पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
उत्तर प्रदेशात भाजपविरुद्ध ताकदीनिशी लढा देत असल्याने समाजवादी पार्टी शेजारच्या उत्तराखंडमध्ये स्वारस्य दाखवीत नाही. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात  भाजपपुढे आव्हान निर्माण करणाऱ्या आम आदमी पार्टीला  उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा आखाडा अप्रासंगिक असल्याची जाणीव झाली आहे. 
पंजाबमध्ये दलित समुदाय ३० टक्के आहे; परंतु, बसपा पंजाबमध्ये  शिरोमणी अकाली दलासोबत युती करून  नवख्याप्रमाणे निवडणूक लढवीत आहे. 
पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच सांगितले होते. काँग्रेसने अशी घोषणा केल्यास उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा लागेल. 

Web Title: Assembly Election 2022: Should Chief Ministerial candidate be declared or not? Challenge before Congress, brainstorming in five states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.