08 Jan, 22 04:30 PM
गोव्यात एका टप्प्यात मतदान
मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणीः १० मार्च २०२२
08 Jan, 22 04:30 PM
पंजाबमध्ये एका टप्प्यात मतदान
मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणीः १० मार्च २०२२
08 Jan, 22 04:29 PM
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत मतदान
पहिला टप्पाः १० फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पाः १४ फेब्रुवारी २०२२
तिसरा टप्पाः २० फेब्रुवारी २०२२
चौथा टप्पाः २३ फेब्रुवारी २०२२
पाचवा टप्पाः २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पाः ३ मार्च २०२२
सातवा टप्पाः ७ मार्च २०२२
मतमोजणीः १० मार्च २०२२
08 Jan, 22 04:18 PM
सर्व राज्यातील निवडणुकांचे निकाल 10 मार्चला - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:16 PM
पंजाब, गोव्यातही एकाच टप्प्यात निवडणुका, मणिपूरमध्ये दोन टप्यात निवडणुका - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:15 PM
रात्री 8 ते सकाळी 8 दरम्यान निवडणूक प्रचारावर पूर्णपणे बंदी - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:11 PM
सात टप्प्यात होणार पाच राज्यांच्या निवडणूका, पंजाब, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:11 PM
कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून पुढील नियम जाहीर केले जातील - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:09 PM
१५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाईक रॅली आणि राजकीय सभांना परवानगी नाही - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:08 PM
सर्व राज्यांमध्ये सध्या लसीकरणाची स्थिती चांगली. गोव्यात 95 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:07 PM
सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार - निवडणूक आयोग
08 Jan, 22 04:01 PM
उमेदवार ऑनलाईन अर्जही भरता येणार, सुविधा App द्वारे विविध सुविधा पुरवल्या जातील - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:59 PM
बेकायदेशीर पैसे वाटप, दारू वाटप यावर करडी नजर असेल सर्व यंत्रणा अलर्टवर आहेत - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:58 PM
900 पर्यवेक्षक निवडणुकीवर लक्ष ठेवतील, पैशांचा दुरुपयोग सहन केला जाणार नाही, सरकारी यंत्रणांचा वापर केला जाऊ देणार नाही - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:56 PM
प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:55 PM
दिव्यांग व्यक्तीसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा असणार - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:54 PM
प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रावर महिलांसाठी महिलांद्वारे संचालित मतदान केंद्र असणार - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:54 PM
24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:53 PM
गोवा आणि मणिपूरमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा 25 लाख रुपये - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:52 PM
उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:49 PM
18 कोटींपेक्षा जास्त लोक मतदान करणार, यामध्ये 8 कोटींपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:47 PM
उत्तर प्रदेशमध्ये 403, पंजाबमध्ये 117, उत्तराखंडमध्ये 70, मणिपूरमध्ये 60 आणि गोव्यात 40 विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत - सुशील चंद्रा
08 Jan, 22 03:39 PM
कोरोना काळात निवडणुका घेणं आव्हानात्मक - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:38 PM
690 विधानसभा जागांवर निवडणुका होणार - निवडणूक आयोग
08 Jan, 22 03:37 PM
मुख्य निवडणूक आयुक्त लाईव्ह
08 Jan, 22 03:34 PM
आचारसंहिता लागू होण्यास काही काळ असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी उचललं मोठं पाऊल; व्ही के भवरा पंजाबचे नवे डीजीपी
08 Jan, 22 03:16 PM
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार
08 Jan, 22 03:18 PM
५ राज्यांपैकी ४ राज्यांमध्ये एनडीएचं सरकार
५ राज्यांपैकी ४ राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत.