शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: वाद, धक्काबुक्की आणि तुंबळ हाणामारी, किरकोळ कारणावरून भर मंचावर भाजपा नेते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:50 IST

UP Assembly Election 2022: कन्नौजमध्ये छिबरामऊ येथे भाजपाची जनविश्वास यात्रा पोहोचली तेव्हा प्रचारसभेदरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मंचावर बसण्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार अभियानाला सुरुवात केली आहे. दरम्यान, कन्नौजमध्ये भाजपाच्या जनविश्वास यात्रेवेळी मंचावर भाजपाचे  नेते किरकोळ कारणावरून मंचावर आपापसात भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  छिबरामऊ येथे भाजपाची जनविश्वास यात्रा पोहोचली तेव्हा प्रचारसभेदरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मंचावर बसण्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.

छिबरामऊच्या नेहरू कॉलेजच्या ग्राऊंडमध्ये शहरातून फिरून झाल्यानंतर भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पोहोचली होती. तिथे सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी तयार करण्यात आलेल्या मंचावर नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत मोठी गर्दी झाली होती. मंचावर जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती. मात्र त्यातून सुरुवातीला वादावादी, नंतर धक्काबुक्की आणि अखेरीस थेट हाणामारीच सुरू झाली. यामध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बिपिन द्विवेदी यांनाही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मंचावर जागा मिळवण्यासाठी भाजपाच्या अनेक नेत्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यामुळे बाचाबाची होऊन प्रकरण आपापसातील हाणामारीपर्यंत पोहोचले. आता या घटनेचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आपसात लढताना दिसत आहेत. अखेर ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढून हे प्रकरण शांत केले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण