शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Assembly Election 2022: पाच राज्यांत विधानसभा निवडणूक: पहिल्यांदाच नरेंद्र मोदी नसणार स्टार प्रचारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 07:38 IST

Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार संपण्यास केवळ दहा दिवस उरले आहेत, मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे अद्याप प्रचार सुरू केलेला नाही.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. मोदींबाबत असा प्रसंग बहुधा पहिल्यांदाच आला आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार संपण्यास केवळ दहा दिवस उरले आहेत, मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे अद्याप प्रचार सुरू केलेला नाही. निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांत मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर  झालेल्या सर्व विधानसभा निवडणुका या मोदींच्या नावावरच लढविण्यात आल्या. २०१७ साली उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपला तीन चतुर्थांश बहुमत मिळाले होते. मोदी यांच्या कार्याकडे पाहून त्या राज्यातील जनतेने भाजपला भरभरून मते दिली होती. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाने वेगळी रणनिती अवलंबली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी हे स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यात २६ प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपने लढविलेल्या २९४ जागांपैकी त्या पक्षाला फक्त ७२ ठिकाणी विजय मिळाला. त्याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकांतही मोदी यांनी जोरदार प्रचार केला होता. 

नेत्यांशी स्पर्धा नाहीपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीमध्येही मोदी विरुद्ध केजरीवाल असे स्वरूप आले होते. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड येथील विधानसभा निवडणुकांत मोदी राज्यस्तरीय नेत्यांशी मुकाबला करत आहेत, असे चित्र दिसू न देण्याची भाजपने काळजी घेतली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२