आसाम : कोक्राझारमध्ये दहशतवादी हल्ला, १४ ठार

By Admin | Updated: August 5, 2016 14:41 IST2016-08-05T14:41:45+5:302016-08-05T14:41:45+5:30

आसाममधील कोक्राझार येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १४ जण ठार झाले आहेत

Assam: A terrorist attack in Kokrajhar, 14 dead | आसाम : कोक्राझारमध्ये दहशतवादी हल्ला, १४ ठार

आसाम : कोक्राझारमध्ये दहशतवादी हल्ला, १४ ठार

ऑनलाइन लोकमत
कोक्राझार, दि. ५ - आसाममधील कोक्राझार येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १४ जण ठार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी कोक्राझार येथे लष्कराच्या वेषात आलेल्या ५ ते ६ दहशतवाद्यांनी बाजारातील नागरिकांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याचे वृत्त मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. या घटनेत १५ नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
कोक्राझार येथील या हल्ल्यामागे नॅशनल डेमॉक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड व उल्फाचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्याचाच फायदा घेत लष्कराच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी जमावावर अंदाधुंद गोळीबार केला तसेच तेथे ग्रेनेडही फेकल्याचे समजते. 
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून त्यांना माहिती दिली आ

 

Web Title: Assam: A terrorist attack in Kokrajhar, 14 dead