शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उंदरांचा सर्जिकल स्ट्राईक; 12 लाखांच्या नोटा कुरतडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 10:55 IST

12 लाखांच्या नोटा उंदरांमुळे 'कागज का तुकडा'

तिनसुकिया: आसामच्या तिनसुकियामध्ये एक अजब प्रकार घडला आहे. तिनसुकियाच्या लाईपुलीमधील एका एसबीआयच्या एटीएममध्ये उंदरांनी धुडगूस घातला आहे. या एटीएममधील तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशांविरोधात लढाईचा भाग म्हणून हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. 'यापुढे हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा कागज का तुकडा होतील,' असं त्यावेळी मोदींनी म्हटलं होतं. आता आसाममधील उंदरांनी नोटा कुरतडून त्यांना शब्दश: 'कागज का तुकडा' केलं आहे. एसबीआयचं एटीएम तांत्रिक कारणांमुळे 20 मेपासून बंद होतं. याबद्दलची माहिती मिळताच कर्मचारी दुरुस्तीसाठी एटीएममध्ये आले आणि तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. याठिकाणी पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे तुकडे त्यांना दिसले. 19 मे रोजी खासगी सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएममध्ये 29.48 लाख रुपये भरले होते. यानंतर पुढच्याच दिवशी एटीएममध्ये तांत्रिक समस्या उद्भवली. यानंतर एटीएम बंद करण्यात आलं.तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच 11 जूनला एटीएमच्या देखभाल दुरुस्तीचं काम पाहणाऱ्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्सचे कर्मचारी एटीएममध्ये आले. कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी एटीएम उघडलं. त्यावेळी त्यांना तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा कुरतडलेल्या अवस्थेत दिसल्या. या प्रकारासाठी काहींनी बँक आणि एटीएमची देखभाल करणाऱ्या कंपनीला जबाबदार धरलं आहे. 20 मे रोजी एटीएममध्ये बिघाड झाला असताना, त्याची दुरुस्ती तब्बल 20 दिवसांनी का करण्यात आली, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.  

टॅग्स :atmएटीएमSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाbankबँकAssamआसाम