शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Assam Meghalaya Border Clash: असाम-मेघालय बॉर्डरवर गोळीबारानंतर हिंसाचार, 6 जणांचा मृत्यू, इंटरनेट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 16:03 IST

Meghalaya News: या घटनेत मेघालयातील पाच आणि असाममधील एका फॉरेस्ट गॉर्डचा मृत्यू झाला आहे.

Assam Meghalaya Border Clash:आसाम-मेघालय सीमेवर मंगळवारी (22 नोव्हेंबर) सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लाकूड तस्करी करणारा ट्रक थांबवला होता, यानंतर हाणामारी झाली आणि वनरक्षकासह सहा जण ठार झाले. या घटनेनंतर मेघालय सरकारने 7 जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा पुढील 48 तासांसाठी बंद केली आहे.

मेघालयातील पश्चिम जयंतिया हिल्स, पूर्व जयंतिया हिल्स, पूर्व खासी हिल्स, री-भोई, पूर्व पश्चिम खासी हिल्स, पश्चिम खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्समध्ये इंटरनेट बंद केले आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी सांगितले की, या घटनेत मेघालयातील पाच आणि आसाममधील एका वनरक्षकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री काय म्हणालेकॉनराड संगमा म्हणाले की, मेघालय पोलिसांच्या वतीने एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. मी या घटनेबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो असून त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी पीटीआयला सांगितले की, आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे तीनच्या सुमारास मेघालय सीमेवर ट्रक अडवला होता.

ट्रक न थांबल्याने गोळीबार झालात्यांनी सांगितले की, ट्रक थांबला नाही तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर गोळीबार केला आणि त्याचे टायर पंक्चर केले. चालक, त्याचा एक सहाय्यक आणि अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले, तर अन्य एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. अली यांनी सांगितले की, वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी या घटनेची माहिती जिरिकेंडिंग पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी गर्दी जमलीयानंतर घटनास्थळी जमाव जमा झाला आणि अटक केलेल्या लोकांना सोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जमावाने वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांना घेराव घातला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना गोळीबार करावा लागला. या घटनेत वनविभागाच्या एका होमगार्डचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. वन कर्मचारी विद्यासिंग लेखे यांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :AssamआसामDeathमृत्यू