शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
3
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
4
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
5
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
6
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
7
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
8
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
9
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
10
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
11
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
12
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
13
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
14
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
15
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
16
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
17
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
18
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
19
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
20
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य

आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:08 IST

पूरामुळे आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

पूरामुळेआसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. आसाममधीलपूर परिस्थिती आणखी बिकट झाली. पुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे या वर्षी पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तसेच सिक्कीमसह या प्रदेशातील सात राज्यांमध्ये मृतांची संख्या ४८ च्या आसपास पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोदींनी मंगळवारी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी ईशान्येकडील राज्यांमधील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी पूराचा सामना करण्यासाठी तसेच मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना

ईशान्येकडील राज्यांमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे पासून पाऊस आणि पुरात झालेल्या ४८ मृत्यूंपैकी सुमारे १७ जणांचा मृत्यू आसाममध्ये झाला आहे. अरुणाचल प्रदेशात १२, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ४, त्रिपुरामध्ये २ आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या १०० दिवसांत फक्त मिझोराममध्ये ६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

२१ जिल्ह्यांमध्ये पूर, लाखो लोक बेघर

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) रिपोर्टनुसार, २१ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसामुळे ६.३३ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. लाखो लोक बेघर झाले आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की २१ जिल्ह्यांतील १५०६ गावांमधील १४,७३९ हेक्टरपेक्षा जास्त पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा आणि इतर सहा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

१०,४७७ घरांचं नुकसान

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे ५६,००० हून अधिक लोकांना फटका बसला आहेत आणि १०,४७७ घरांचं नुकसान झाले आहे. पुरामुळे राजधानी इम्फाळ आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भागात पूर आला आहे. 

नागालँडमध्ये मुसळधार पाऊस

नागालँडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिमा जिल्ह्यातील फेसामा गावात राष्ट्रीय महामार्ग-२ चा ५० मीटरचा भाग वाहून गेला. त्यामुळे नागालँड आणि मणिपूरमधील वाहतुकीच्या मुख्य मार्गाशी संपर्क तुटला. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मणिपूरला जाणारे १०० हून अधिक मालवाहू ट्रक रविवारपासून रस्त्यावर अडकले आहेत. कारण पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नाही.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामsikkimसिक्किमNarendra Modiनरेंद्र मोदीAssam Floodआसाम पूरTripuraत्रिपुराArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश