शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार", बालविवाहाविरोधात हिमंता सरकारची मोठी कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:33 IST

बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत.

गुवाहाटी : आसामचे हिमंता बिस्वा सरमा सरकार बालविवाहाच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. बालविवाहाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून आसाम पोलिसांनी काल रात्री ४१६ जणांना अटक केली असून ३३५ गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बालविवाहाबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची पोस्टही समोर आली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आसामने बालविवाहाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. काल रात्री सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात ४१६ अटक करण्यात आली असून ३३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलणार आहोत.

याचबरोबर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममधील लोकांची ओळख जपण्यासाठी आणि त्यांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार अथक प्रयत्न करत आहे. तसेच, घुसखोरांचा प्रभाव मर्यादित करण्यासाठी सरकार सीमांकनासाठी काम करत आहे. याशिवाय, राज्य सरकारने दहा हजार हेक्टर जमीन अतिक्रमणातून मुक्त केली आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.

सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करत राहीलयाआधी १० डिसेंबर रोजी सोनितपूर जिल्ह्यातील जमुरीहाट येथे भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या स्वाहिद दिवस सोहळ्यात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते. त्यावेळी आसाम सरकार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. तसेच, आसाम चळवळीत जात, माती आणि वारसा यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी श्रद्धांजली वाहिली होती.

टॅग्स :AssamआसामCrime Newsगुन्हेगारी