शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्राचे आमदार येथे राहतात की नाही, हे मला माहीत नाही", आसामच्या मुख्यमंत्र्यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 09:51 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह आसाममधील  (Assam) गुवाहाटीच्या (Guwahati)हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे.

वृत्तसंस्था 'एएनआय'सोबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही, असे हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. 

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचे बंड थंड करण्यासाठी व सरकार वाचविण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हा, अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ती धुडकावून लावल्याचे समजते. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी म्हटले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची  साथ सोडा आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी अट ठेवली. आता सरकार टिकविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी शिवसेनेने दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :AssamआसामMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना